गणेश मूर्ती करा, घरच्या घरी!
गणेश मूर्ति करण्याची सोपी पद्धत आणि ती सुद्धा कोणताही साचा न वापरता, आता मराठी भाषेतून
Description
सोशल डिस्टंसिंग च्या या जमान्यात गणेश मूर्ति आणण्यासाठी बाहेर जाणं सुरक्षित नाही आणि ती मूर्ति पर्यावरणस्नेही (मातीची) असेल याचीही खात्री नाही, मग आपणच अगदी सोप्या पद्धतीने एक श्रीगणेशाची मूर्ति का तयार करू नये?
माझा हा ऑनलाईन कोर्स बघून, अशी मूर्ति स्वतः तयार करणं अगदी सोपं आहे, ते सुद्धा कोणताही साचा न वापरता!
माझं नाव मंदार मराठे आहे आणि मी एक चित्रकार आणि मूर्तिकार आहे. २०११ पासून मी काही हजार लोकांना अशी गणेश मूर्ति घडवायला शिकवलं आहे. अगदी ४ थी पाचवीतल्या मुलांपासून ते ७०- ७५ च्या आजी आजोबांपर्यंत!
तर या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण सुरुवातीला मूर्ति चे सुटे भाग तयार करणार, नंतर ते जोडणार, आणि मग मूर्तिचे बारकावे घडविणार. हे सगळं मी तुम्हाला अगदी टप्याटप्यानं दाखवणार आणि सांगणार आहे म्हणजे तुम्हाला माझ्या बरोबरच अशी मूर्ति करता येईल. या पद्धती मुळे, तुम्ही आधी कधीही जरी मातीत काही केलं नसेल तरीही तुम्हाला अशी मूर्ति करायला काहीही अडचण येणार नाही.
ही मूर्ति पूर्णपणे पर्यावरणस्नेही तर असेलच पण स्वतः च्या हातानी, आपल्या कुटुंबीयांसोबत ती तुम्ही तयार केल्यामुळे त्याचं समाधान काही वेगळंच असेल.
तुम्ही प्रथमच केलेली गणेश मूर्ति चांगली झाली नाही तरी निराश होऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस केलेली मूर्ति तुम्ही आधी केलेल्या मूर्तिपेक्षा नक्कीच चांगली असेल.
चला तर मग, हा कोर्स घ्या आणि माझ्याबरोबर घरच्या घरी गणेश मूर्ति करा!
What You Will Learn!
- गणेश मूर्ति करण्याची सोपी पद्धत शिका
- शाडू माती वापरायची भीती घालवा
- मूर्तिकला अगदी सोप्या पद्धतीने शिका
- स्वहस्ते श्रीगणेशाची मूर्ति करण्याचे समाधान मिळवा
Who Should Attend!
- ज्यांना स्वतः श्रीगणेशाची मूर्ति करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी
- ज्यांना मातीत खेळायला आवडते त्यांच्यासाठी
- ज्यांना मूर्तिकला शिकायची आहे त्यांच्यासाठी